विषय : भूगोल
प्र. 9. खालीलपकी कोणते ठिकाण लोह खनिजासाठी प्रसिद्ध नाही?
पर्याय : 1) राणीगंज (प. बंगाल) 2) सिंगोराणी (आंध्रप्रदेश)
3) कोरबा (छत्तीसगड) 4) दिग्बोई (आसाम)
प्र. 10. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) देशातील एकूण वीज उत्पादनात औष्णिक विजेचा वाटा सर्वाधिक आहे.
ब) गुजरात या राज्यात तेल रासायनिक उद्योगांचा विकास तुलनात्मकदृष्टय़ा अधिक झाला आहे.
पर्याय : 1) विधान अ बरोबर आहे.
2) विधान अ व ब बरोबर आहे .
3) विधान ब बरोबर आहे.
4) विधान अ व ब चूक आहे.
प्र. 11. खालीलपकी कोणती जोडी चुकीची आहे?
पर्याय : अ) काझीरंगा नॅशनल पार्क – आसाम
ब) शिवपुरी नॅशनल पार्क – शिवपुरी (कर्नाटक)
क) बंदीपूर नॅशनल पार्क – म्हैसूर (कर्नाटक)
ड) रणथंबोर नॅशनल पार्क – राजस्थान
शिवपुरी नॅशनल पार्क – शिवपुरी (मध्य प्रदेश)
प्र. 12. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) देशातील गव्हाच्या हेक्टरी उत्पादनाचा विचार करता उत्तर प्रदेश हे राज्य प्रथम स्थानावर आहे.
ब) भारतीय पोलीस सेवेतील उच्च अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे आहे.
पर्याय : 1) विधान अ बरोबर आहे.
2) विधान अ व ब बरोबर आहे.
3) विधान ब बरोबर आहे.
4) विधान अ व ब चूक आहे.
= देशातील गव्हाच्या दर हेक्टरी उत्पादनाचा विचार करता पंजाब हे राज्य प्रथम स्थानावर आहे, तर गव्हाचे सर्वाधिक उत्पादन उत्तर प्रदेशात होते.
= भारतीय पोलीस सेवेतील उच्च अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण केंद्र हैद्राबाद येथे आहे.
प्र. 13. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) विजयंता रणगाडा व शक्तिमान ट्रक हे बोकारो येथे तयार होतात.
ब) भारतातील सर्वात उंचीवरील विमानतळ जुब्बर हट्टी हे उत्तरांचल या ठिकाणी आहे.
पर्याय : 1) विधान अ बरोबर आहे.
2) विधान अ व ब बरोबर आहे.
3) विधान ब बरोबर आहे.
4) विधान अ व ब चूक आहे.
= विजयंता रणगाडा, शक्तिमान ट्रक, अजय रणगाडा हे आवडी (तामिळनाडू) येथे तयार होतात.
= भारतातील सर्वात उंचीवरील विमानतळ जुब्बर हट्टी हे हिमाचल प्रदेश या ठिकाणी आहे.
प्र. 14. खालीलपकी कोणती नदी हिमाचल प्रदेशातून वाहत नाही.
पर्याय : 1) बियास 2) रावी
3) सतलज 4) श्योक
प्र. 15. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) भारतातील दिल्ली या संघराज्यास स्वतंत्र उच्च न्यायालय नाही.
ब) भारतातील गोवा या राज्यास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे.
पर्याय : 1) विधान अ बरोबर आहे.
2) विधान अ व ब बरोबर आहे.
3) विधान ब बरोबर आहे.
4) विधान अ व ब चूक आहे.
प्र. 16. खालील डोंगर रांगेचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा.
अ) महादेव डोंगररांगा
ब) सह्य़ाद्री पर्वत
क) सातपुडा पर्वतरांगा
पर्याय : 1) अ,ब,क 2) अ,क,ब 3) ब,अ,क 4) ब,क,अ
प्र. 17. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) आसाम राज्याची सीमा भूतान आणि बांगलादेश यांना लागून आहे.
ब) पश्चिम बंगालची सीमा भूतान आणि नेपाळ यांना लागून आहे.
क) मिझोराम या राज्याची सीमा बांगलादेश आणि म्यानमार यांना लागून आहे.
पर्याय : 1) अ, ब आणि क 2) फक्त ब आणि क
3) अ आणि ब 4) फक्त अ आणि क
प्रश्नांची उत्तरे : प्र. ९- ४, प्र. १०- २, प्र. ११- ब, प्र. १२- ४, प्र. १३- ४, प्र. १४- ४, प्र. १५- ४, प्र. १६- २ प्र. १७- १.
डॉ. जी. आर. पाटील