वस्तुनिष्ठ प्रश्नसंच- सामान्य विज्ञान
प्र. 1.    खालीलपकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ)    सी.एन.जी.चा वापर वाहन इंधन म्हणून केला जातो.
ब)    नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट फरिदाबाद येथे आहे.
पर्याय :    1) अ विधान चूक आहे.
    2) ब विधान चूक आहे.
    3) अ व ब विधान चूक आहे.
    4) अ व ब विधान बरोबर आहे.
प्र. 2. भारतात पेट्रोलमध्ये किती प्रमाणात इथेनॉल मिसळण्याची परवानगी देण्यात आली आहे?
पर्याय :    1) 5%    2) 10%    3) 12%    4) 15%
प्र. 3.    खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे ?
अ)    अणुबॉम्बचे कार्य अनियंत्रित शृंखला अभिक्रियेद्वारे चालते.
ब)    अणुभट्टीमध्ये न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्रॅफाईड किंवा जडपाणी यांचा संचलक म्हणून वापर करतात.
पर्याय :    1)    अ विधान बरोबर आहे.
    2) ब विधान बरोबर आहे.
    3) अ व ब विधान बरोबर आहे.
    4) अ व ब विधान चूक आहे.
प्र. 4. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ)    तामिळनाडूमध्ये कुडांकुलम येथे स्थापन केली जात असलेली अणुभट्टी ही ‘प्रेशराइज्ड वॉटर रिअ‍ॅक्टर’ या प्रकारची आहे.
ब)    फास्ट ब्रिडर रिअ‍ॅक्टरमध्ये इंधन म्हणून प्ल्युटोनियम – 239 तर शीतक म्हणून द्रवरूप सोडियम वापरले जाते.
पर्याय :    1) अ विधान बरोबर आहे.
    2) ब विधान बरोबर आहे.
    3) अ व ब विधान बरोबर आहे.
    4) अ व ब विधान चूक आहे.
प्र. 5. खालीलपकी कोणती जोडी चुकीची आहे?
पर्याय :    1) अणुशक्ती आयोगाची स्थापना    – 1948
    2) अणुऊर्जा खात्याची स्थापना    – 1954
    3) न्यूक्लिअर फ्युअल कॉम्प्लेक्स – हैदराबाद
    4) हायड्रोजन बॉम्ब- केंद्रीय विखंडनावर आधारित
(योग्य विधान : हायट्रोजन बॉम्ब-केंद्रिय संमिलनावर आधारित)
प्र. 6. ‘इन्सॅट’ उपग्रह कोणत्या कक्षेत भम्रण करतात?
पर्याय :    1) अंडाकृती व विषववृत्तीय    3) अंडाकृती व ध्रुवीय
    2) वर्तुळाकार व विषववृत्तीय    4) वर्तुळाकार व ध्रुवीय
प्र. 7.    खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) ‘आयआरएस’ उपग्रह हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 900 ते 1200 कि.मी. एवढय़ा अंतरावर सोडले जातात.
ब)    ‘इन्सॅट’ हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 36 हजार कि. मी. अंतरावर सोडले जातात.
पर्याय :    1) अ विधान बरोबर आहे.
    3) अ व ब विधान बरोबर आहे.
    2) ब विधान बरोबर आहे.
    4) अ व ब विधान चूक आहे.
प्र. 8.     खालीलपकी कोणती जोडी चुकीची आहे?
पर्याय :    1) पिनाक    –     रॉकेट प्रेक्षपक
    2) अर्जुन    –    लढाऊ रणगाडा
    3) लक्ष्य    –    वैमानिकरहित विमान
    4) सारथ    –    कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र
(योग्य विधान : सारथ – लढाऊ विमान)
प्र. 9.    खालीलपकी कोणती जोडी चुकीची आहे ?
पर्याय :    1) कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग – दापोडी (पुणे)
    2) ब्राह्मोस    –    सुपरसॉनिक ब्लॅस्टिक क्षेपणास्त्र
    3) बराक    –    क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्र
    4) फाल्कन    –    रडार यंत्रणा
(योग्य विधान : ब्राह्मोस -सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र)
प्र. 10.    खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ)    ‘इस्त्रो’ने 25 फेब्रुवारी 2013 मध्ये ढरछश् उ 20 या प्रक्षेपकाद्वारे एकाच वेळी सात उपग्रह श्रीहरीकोटा  येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले.
ब)    भारताच्या ‘पीएसएलव्ही’ या उपग्रह प्रक्षेपकांची ही सलग 20 मोहीम होती.
पर्याय :    1) अ विधान बरोबर आहे.
    3) अ व ब विधान बरोबर आहे.
    2) ब विधान बरोबर आहे.
    4) अ व ब विधान चूक आहे.
(योग्य विधान : भारताच्या ‘पीएसएलव्ही’ या उपग्रह प्रेक्षपकांची ही सलग 22 मोहीम होती.)
प्रश्नांची उत्तरे : प्र. १- ४, प्र. २- १, प्र. ३- ३, प्र. ४- ३,
प्र. ५- ४, प्र. ६- २, प्र. ७- ३, प्र. ८- ४, प्र. ९- २, प्र. १०- २.
(क्रमश:)