कोल्हापूर : पाणी उपसा परवाना मिळण्यासाठी ५ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारत असताना पाटबंधारे विभागातील मोजणीदार सोमवारी रंगेहात पकडला गेला. सागर गुणवंत गोळे (वय ३६ ) असे या कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांनी ताम्रपर्णी नदीतून शेतीसाठी पाणी उपसा मिळण्यासाठी चंदगड लघु पाटबंधारे विभागाकडे मागणी अर्ज केला होता. परवाना देण्यासाठी तक्रारी पूर्वी साडेआठ हजार रुपये लाचेची मागणी लघुपाटबंधारे चंदगडचे मोजणीदार सागर गोळे याने केली होती. त्यापैकी ३ हजार रुपयाची लाच यापूर्वीच त्याने स्वीकारली होती. उर्वरित रकमेवर तडजोडीअंती ५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. ही रक्कम स्वीकारत असताना आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास रंगेहात पकडले.