कोल्हापूर : आजरा पोलिसांनी आज खून करून मृतदेह जाळणाऱ्या आरोपींच्या हातात बेड्या घातल्या. गजेंद्र सुभाष वांडे याचा खून केल्याप्रकरणी त्याची प्रेयसी सुनिता सुभाष देवकाई (४४ रा. खोपोली ता. खालापूर जि. रायगड), अमित पोटे (रा. सुळे ता. आजरा) व सुरज सुभाष देवकाई रा. खोपोली या आरोपींना ताब्यात घेतले आहे.

आजरा पोलीस ठाणे हद्दित बहिरेवाडी येथे आंतरराज्य चेक पोस्टवरून एक पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी भरधाव वेगाने निघून गेली. संशय आल्याने या वाहनाचा शोध घेत असताना बहिरेवाडी ते मुम्मेवाडी पाटामध्ये एक व्यक्ती मोटारीसह थांबलेला दिसला. चौकशी केली असता त्याने पत्नी झुडपामध्ये शौचास गेली आहे असे सांगितले. पोलीस पथकातील महिला अंमलदार यांनी झुडपाकडे जावून पाहिले तेव्हा तेथे एक महिला दिसली. तिच्यासमोर मोठी प्रवाशी बॅग, चार प्लॅस्टिकच्या पेट्रोलच्या बाटल्या व हरभरा कोंढा दिसला. संशय आल्याने तिच्याकडे चौकशी सुरू केली. याचवेळी तिच्या सोबतची व्यक्ती मोटारीतून निघून गेली.

हेही वाचा – बारामती, शिरूरमधील नाराजांच्या मनधरणीसाठी फडणवीसांची धावाधाव

फसवणूक केल्याने खून

पोलिसांनी हा काय प्रकार आहे अशी विचारणा केली असता त्यावर त्या महिलेने सांगितले की, गजेंद्र सुभाष वांडे (३८ रा. जिंतूर जि. परभणी) याचा हा मृतदेह आहे. तिचे व गजेंद्रचे २ वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. गजेंद्र याने सुनिता सुभाष देवकाई हिच्याशी लग्न करतो असे सांगून फसवणूक केली. तिच्याकडून वेळवेळी पैसे घेतले. ते पैसे मागूनही परत दिले नाही. त्या रागापोटी २७ मार्चला गजेंद्र यास हरळीकर (रा. खोपोली) याच्या खोलीत बोलावले. तिने त्यास झोपेच्या गोळया दिल्या. तो झोपी गेल्यानंतर ओळखीच्या अमित पोटे (रा. सुळे ता. आजरा) यास बोलावून घेतले. त्या दोघांनी मिळून त्याचा गळा आवळून ठार मारले.

हेही वाचा – उमेदवारीसाठी वसंत मोरेंची वणवण

मृतदेह नष्ट करण्याचे कारस्थान

दुसऱ्या दिवशी तीने बाजारात जावून एक मोठी प्रवाशी बॅग आणली. अमित पोटे व त्याचा मुलगा सुरज यांच्या मदतीने मृतदेह बॅगमध्ये घातला. अमित पोटे याने गाडी भाड्याने बोलवून घेतली. त्या गाडीमध्ये मृतदेह असलेली बॅग ठेवली. सुनिता देवकाई व अमित पोटे, ड्रायव्हर असे कोल्हापूरमध्ये आले. कागल येथे पेट्रोल पंपावर चार बॉटल पेट्रोल घेवून गजेंद्रचा मृतदेह बहिरेवाडी – मुम्मेवाडी घाटात जाळणार होते. तोवर पकडले गेलो, अशी कबुली तिने दिली.