कोल्हापूर : अजित पवार हे आता महायुतीमध्ये शिंदे आणि फडणवीस यांच्या सोबत सत्तेमध्ये सहभागी आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळे बारामती मध्ये खासदार सुप्रिया सुळे या लोकसभा निवडणुकीला उभ्या राहिल्या तरी अजित पवार त्यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी नक्कीच जातील,असे मत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

महासंपर्क अभियानंतर्गत बारमती येथे आपल्या बारामती जिंकायची आहे, असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. त्यावर मुश्रीफ यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. पुण्यातील ससून रुग्णालयातील घोटाळा,सराईत गुन्हेगार, आर्थिक घोटाळ्यातील आरोपींचा कारागृहात तसेच कारागृहाबाहेर वावर तसेच कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातील घोटाळा याची चौकशी एका समितीद्वारे केली जाणार आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

कोल्हापूर हद्दवाढ गरजेची

कोल्हापूर शहराचा विकास होण्यासाठी लोकसंख्या कमी असल्याचा अडसर आहे. केंद्राच्या योजना लागू होत नाहीत. त्यामुळे जवळची गावे घेऊन हद्दवाढ केली जाणार आहे, असा पुनरुच्चार मुश्रीफ यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इचलकरंजीला कृष्णेचे पाणी

इचलकरंजी येथे आज कागल सुळकुड योजनेसाठी उपोषण करण्यात आले. त्यावर मुश्रीफ म्हणाले, कागल,सीमाभाग,शिरोळ तालुक्यातील लोकांना पाणी कमी पडत असल्याने त्यांचा या योजनेला विरोध आहे. सद्याची कृष्णा योजना बळकट करून इचलकरंजीला शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा करण्यात येईल.