महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी अशोक मल्लय्या स्वामी यांची गुरुवारी फेरनिवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी सविता विठ्ठलराव सोनखेडकर यांची निवड करण्यात आली.

राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. संचालक मंडळामध्ये अशोक मल्लय्या स्वामी, दिलीप अमृतलाल मुथा, सुनिल महारुद्र तोडकर, पृथ्वीराज सयाजीराव देशमुख, रणजित धैर्यशील देशमुख, बाबाराव साहेबराव पाटील, राजशेखर विरुपाक्ष शिवदारे, राहुल नानासाहेब महाडीक,प्रा. किसनराव विठ्ठलराव कुराडे, वीरेंद्र हरिभाऊ गजभिये, सविता विठ्ठलराव सोनखेडकर (गायकवाड), रोहिणी प्रांजल खडसे-खेवलकर, अशोकराव कोंडीबा माने, चंद्रकांत प्रभाकर बडवे, विश्वनाथ तुकाराम मेटे यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक संस्थेच्या बेलार्ड इस्टेट मुंबई येथील कार्यालयात अध्यासी अधिकारी अविनाश भागवत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होवून त्यामध्ये ही निवड करण्यात आली.