कोल्हापूर : मराठी, नाट्य चित्रपट सृष्टी गाजवलेले चतुरस्त्र अभिनेते स्वर्गीय अरुण सरनाईक यांच्या जीवनावर आधारित माहितीपटाचे सादरीकरण रविवारी (२२ जून) सकाळी साडेदहा वाजता येथील देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सरनाईक यांच्या कन्या डॉ. सविता नाईकनवरे, रणजीत नाईकनवरे, नील नाईकनवरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर ही अरुण सरनाईक यांची जन्म आणि कर्मभूमी होती. त्यांचे मुंबईचे जावई, एक गाव बारा भानगडी, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, सिंहासन आदी चित्रपट गाजले. ते उत्तम गायक होते. २१ जून १९८४ रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांची कन्या डॉ. सविता सरनाईक नाईकनवरे यांनी पुढाकार घेऊन अरुण सरनाईक यांच्या आयुष्याचा कला आणि जीवन प्रवासाचा वेध घेणारा ७५ मिनिटांचा ‘पप्पा सांगा कुणाचे’ हा माहितीपट बनवला आहे. तो डॉ. संतोष पाठारे यांनी दिग्दर्शित केला असून संकल्पना विशाखा तुंगारे देशपांडे यांची आहे. माहितीपटात सरनाईक यांच्या आठवणी, त्यांच्याबद्दलच्या प्रतिक्रिया पाहता येतील.