कोल्हापूर : कोल्हापुरातील बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीचे वारे सध्या तापले आहे. या वेळी एका प्रचार सभेत बोलताना राष्ट्रवादीचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपबद्दलचा आपला राग आळवताना, ‘या निवडणुकीत भाजप आपल्या बरोबर येईल, असे वाटत नाही. कारण तेच मला तुरुंगात घालायला निघाले होते’, अशा शब्दांमध्ये टीकास्त्र सोडले आहे. या विधानाला स्थानिक राजकारणाचे कंगोरे असले तरी यातून मुश्रीफ यांनी सत्तेच्या दिशेने प्रवास का केला, याची चर्चा येथे रंगली आहे. 

हेही वाचा >>> कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ यांचा घोषणांचा सुकाळ, प्रत्यक्ष हाती किती लागणार ?

कोल्हापुरातील बिद्री साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. कारखान्यावर सध्या राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील यांची सत्ता आहे. त्यांना मुश्रीफ गटाचा पाठिंबा आहे. पाटील यांच्या विरोधात शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर निवडणूक रिंगणात आहेत. आबिटकर यांना भाजपचे माजी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांचा पाठिंबा आहे. त्यांच्या पाठिंब्याचा हाच संदर्भ घेत मुश्रीफ यांनी वरील विधान केले आहे.