कोल्हापूर : विशाळगड अतिक्रमणांबाबत केवळ दिखाऊपणा करणाऱ्या गुरुवारच्या प्रशासकीय बैठकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी जाहीर केले. ते म्हणाले, अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात ४ जुलै २०२२ रोजी विशाळगडाला भेट देऊन पाहणी केली होती. चार दिवसानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाची बैठक बोलवली होती. विशाळगड मुक्तीसाठी अनेक वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या संघटनांचे प्रतिनिधीदेखील या बैठकीस उपस्थित होते. आमच्या मागणीनुसार विशाळगडावर पशूपक्षी हत्याबंदी लागू करण्यात आली होती. गडावरील अतिक्रमणे पुढील तीन महिन्यांत हटविण्याची ग्वाही जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत दिली होती.

आमदार कोरे यांचा हस्तक्षेप ?

दुसऱ्याच दिवशी गड पायथ्याचे अतिक्रमण हटविण्याची जुजबी कारवाई करण्यात आली. स्थानिक आमदारांसोबत प्रतिबैठक झाल्यानंतर सर्वच कारवाया थांबविण्यात आल्या. दीड वर्षांत प्रशासनाकडून कोणतीच कारवाई झालेली नाही. सध्या सत्तेत असलेल्या स्थानिक राजकीय नेत्याच्या दबावामुळे हा न्यायप्रविष्ट विषय असल्याचे सांगत प्रशासनाने यातून अंग काढून घेण्याची भूमिका ठेवली. न्यायालयात काही पाठपुरावा करण्याचे कष्ट देखील प्रशासनाने घेतले नाहीत. न्यायालयाची एकही तारीख घेतली नाही.

हेही वाचा – सोलापूर : हरी नामाचा गजर, फुलांची उधळण करून माउलींच्या पालखीचे स्वागत, पहिले गोल रिंगण उद्या पुरंदवडे येथे

हेही वाचा – “गद्दारी नामशेष करण्यासाठी…”, जयंत पाटलांचा रोख कुणाकडे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारवाईची धमक दाखवा

शिवभक्त १४ जुलै रोजी मोठ्या संख्येने गडावर जाणार, असे आम्ही जाहीर करताच, शिवभक्तांचा आक्रोश पाहून प्रशासनाला जाग आली. आज या विषयावरील बैठकीचे आयोजन केले आहे. अजूनही तीन दिवस राहिलेले आहेत. बैठकांचा खेळ दाखविण्यापेक्षा कारवाईची धमक दाखवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.