राज्य वन्य विभागाच्या स्पर्धा परीक्षा वेळी परीक्षार्थींना मोबाईल पुरवला गेल्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी कोल्हापुरात अन्य परीक्षार्थीनी जोरदार आक्षेप नोंदवत आंदोलन केले. यावरून गोंधळ उडाला. या प्रकाराची शासनाने चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्य वन्य विभागाची विभागातील नोकर भरतीसाठी जिल्हानिहाय परीक्षा सुरू आहे.

हेही वाचा >>> गगनबावड्यात ‘मॉण्टेनचा तस्कर’ दुर्मीळ सापाचा शोध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोकरीची संधी असल्याने मोठ्या अपेक्षेने विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. यापूर्वी स्पर्धा परीक्षेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडे मोबाईल आढळले आहेत. असाच प्रकार आज शिये येथील केंद्रात घडला तेथे विद्यार्थ्याकडे मोबाईल असल्याचे दिसून आले. त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला. परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी मोठ्या संख्येने केंद्राबाहेर जमले.  त्यांनी संघाटीतपणे या प्रकारा विरोधात घोषणाबाजी सुरू केली. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.  मात्र कडक तपासणी करून केंद्रात सोडले जात असतानाही मोबाईल आत पोहोचलाच कसा असा मुद्दा उपस्थित करीत अन्य परीक्षार्थीनी आपले म्हणणे जोर जोराने मांडायला सुरुवात केले. राज्य शासनाने या प्रकारामध्ये लक्ष घालून चौकशी करावी अन्यथा आंदोलन करावे लागेल, अशी प्रतिक्रिया यावेळी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे गिरीश फोंडे यांनी व्यक्त केली.