कोल्हापूर : राज्यात आणि केंद्रात महायुती म्हणून आपण काम करतो. महायुतीच्या माध्यमातूनच आगामी निवडणुका लढवल्या जातील. पण जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महापौर भाजपचे केले जातील, अशा शब्दांत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी असे महायुतीचे निवडणुकीचे नवे समीकरण येथे मांडले.
कोल्हापूर जिल्हा भाजप कार्यालयात तीन जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या बैठका मंत्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. जिल्हा परिषद गटनिहाय, नगरपालिकानिहाय आढावा घेण्यात आला. राज्य शासनाच्या महत्त्वाच्या योजना, गोरगरिबांच्या कल्याणार्थ शासन करत असलेले काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी जनतेत घेऊन जावे. आगामी निवडणुकांसाठी समाजाच्या संपर्कात राहावे, अशा सूचना पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजी पाटील, आमदार राहुल आवाडे, माजी राज्यमंत्री भरमू पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन नाईक निंबाळकर, राहुल चिकोडे, शौमिका महाडिक, पदाधिकारी, नगरसेवक, मंडल अध्यक्ष, मोर्चा अध्यक्ष उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाल्या निमित्त शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने ‘ संघ गंगा के तीन भगीरथ’ हे दोन अंकी नाटक कोल्हापूर मध्ये आयोजित करण्यात आले होते. या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. ते म्हणाले, शंभर वर्ष पूर्ण झाल्या निमित्त इथे उपस्थित असणाऱ्या सर्व स्वयंसेवकांनी कार्यकर्त्यांनी संघाचा विचार घराघरापर्यंत अजून ज्या ठिकाणी पोचलेला नाही त्या ठिकाणी पोचवणे ही विशेष जबाबदारी असणार आहे. तसेच संघ विचाराला दलीत, शोषित, पीडित समाजापर्यंत पोहोचवणे व या देशाला परम वैभव प्राप्त करून देणे हेच आपले कर्तव्य असणार आहे. या दोन अंकी नाटकाला कोल्हापुरातील जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला. तसेच हे नाटक संपल्यानंतर अनेक संघ स्वयंसेवकांनी अतिशय उत्तमरित्या हे नाटक सादर केल्याबद्दल ह्या नाटकाचे संयोजन करणाऱ्या पेंडसे दांपत्याचे विशेष आभार मानले. आप्पासाहेब दड्डीकर , डॉक्टर सूर्यकिरण वाघ, प्रमोद ढोले, प्रफुल्ल जोशी, मुकुंद भावे , केदार जोशी , हेमंत आराध्य , संतोष दिवटे , सतीश अंबडेकर , विराट चिखलीकर , अमर साठे , गायत्री राऊत , रविकिरण गवळी इत्यादी का