कोल्हापूर : देशातील विद्यमान सरकारची वाटचाल पाहता देशात लोकशाही, प्रजासत्ताक आणि राज्यघटना धोक्यात आले आहे. त्यापासून देशाला वाचवण्यासाठी आमचे सर्वात पहिले उद्दिष्ट हे भाजपला पराभूत करणे राहील. यासाठी आम्ही इंडिया आघाडी सोबत आहोत, असे मत
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव माजी खासदार कॉम्रेड डी राजा यांनी व्यक्त केले.

प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मोदींनी वास्तवात कोणताही विकास केलेला नाही. त्यांना आम्ही आव्हान देतो की त्यांनी लोकांच्या वास्तववादी जीवन मरणाशी निगडित मुद्द्यांवर बोलावे. देशाचा मानवी विकास निर्देशांकामध्ये देशाचा स्तर घसरला. भूक निर्देशांकमध्ये देश मागे आहे. गरीबी, बेरोजगारीमध्ये जनता होरपळत आहे. पत्रकारितेचे स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये देखील देशात स्तर घसरला आहे.

narendra modi
“भारताची आण्विक शस्त्रास्रे नष्ट करण्याचा कट”, पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीवर आरोप
sunil tatkare on raj thackeray support,
“रायगडमध्ये मनसेची मोठी ताकद, त्यामुळे…”; राज ठाकरेंच्या पाठिंब्यानंतर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
Thailand House of Representatives approves same sex marriage
समलैंगिक विवाहाला आता थायलंडमध्येही मान्यता… हा प्रवास आव्हानात्मक कसा ठरला?
us clear stand on gaza ceasefire
गाझातील शस्त्रविरामासाठी अमेरिकेची स्पष्ट भूमिका; नकाराधिकाराचा वापर टाळल्याने यूएनएससीमध्ये ठराव मंजूर, नेतान्याहूंचा अमेरिका दौरा रद्द

हेही वाचा – मोदी मुमकिन नव्हे नामुमकिन; शरद पवार यांची टीका

शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली

दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. कारण मोदींची गॅरंटी होती की शेतकऱ्यांना एमएसपी कायदा पारित करतो. पण भाजप सरकारने पलटी मारली. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्याचे नाटक करणारे हे सरकार त्यांनी केलेल्या एमएसपी सारख्या शिफारशीवर कानाडोळा करत आहे. कोणतेही जमिनीवर मूलभूत काम न करता मोदी सरकार ढोंगी प्रचार करत आहे. ते लोकांची विचार करण्याची शक्ती हायजॅक करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

मोदींचा कार्यकाळ विध्वंसकारी

मोदींचा कार्यकाळ हा विध्वंसकारी राहिला आहे. आम्ही देशातील सर्व धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांना आवाहन केले आहे की त्यांनी जनतेमध्ये जावे व मोदी सरकारच्या विरोधात लोकांना जागरूक करावे. काहीही करून भाजपला केंद्रामध्ये पराभूत करावे लागेल. देशातील घटनाकृत विविध स्वायत्त संस्थांच्यावर हल्ले होत आहेत, हस्तक्षेप होत आहे. निवडणूक आयोग हा भाजपचा प्रचार संस्थेसारखा काम करत आहे. आमच्या पक्षाचे खासदार इंद्रजीत गुप्तांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या निवडणूक सुधारणा आयोग शिफारशीच्यांवर अजून देखील संसदेत चर्चा केलेली नाही. पण भारतासारख्या वैविध्य असलेल्या देशांमध्ये भाजप आरएसएस हे “वन नेशन वन इलेक्शन ” योजना लागू करू पाहत आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा याला विरोध आहे. ईव्हीएम शिवाय मतपत्रिकेवर देशात निवडणूक घेण्याची आमची मागणी आहे. मोदी म्हणतात सबका साथ सबका विकास. पण मोदींची कोणाबरोबर साथ आहे? महिला, युवक, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नांच्याकडे दुर्लक्ष करून सबका साथ सबका विकास कसे म्हणता येईल.

हेही वाचा – बाजार समितीत कायमस्वपरूपी प्रशासक नेमणुकीचा निर्णय मागे घ्या, अन्यथा.. ; राजू शेट्टी यांचा इशारा

शिर्डी, परभणी मतदारसंघाची मागणी

यावेळी बोलताना भा.क.प.चे राज्यसचिव कॉम्रेड सुभाष लांडे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने फोडाफोडीचे राजकारण करून राजकीय संस्कृती लयास घालवली आहे. जनता भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात सडेतोड उत्तर देईल. आम्ही देशपातळीवर इंडिया आघाडी व महाविकास आघाडी बरोबर आहोत. शिर्डी व परभणी अशा दोन लोकसभा मतदारसंघांची आम्ही आघाडीकडे मागणी केली आहे. तिथून निवडणूक लढण्याची पक्षाची तयारी चालू आहे.

पत्रकार परिषदेला पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे, जिल्हा सेक्रेटरी गिरीश फोंडे, दिलीप पवार, दिलदार मुजावर यासह कार्यकर्ते उपस्थित होते.