शहीद राजेंद्र तुपारे यांच्या पाíथवावर आज अंत्यसंस्कार
कोल्हापूर जिल्ह्य़ातील कार्वे गावचे सुपुत्र शहीद राजेंद्र तुपारे यांच्या पाíथवावर उद्या मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गावातील ग्रामस्थ महात्मा फुले विद्यालयाच्या पटांगणात सोमवारी दिवसभर अंत्यविधीची तयारी करीत होते. संपूर्ण गाव दु:खात बुडाले आहे. गावातील व्यवहार आजही बंद ठेवले होते. उद्या चंदगड तालुक्यातील व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.
जम्मू-काश्मीरमधील पुंछ भागात पाकिस्तानी सन्याकडून झालेल्या गोळीबारात तुपारे शहीद झाले. त्यांनी भारतीय सैन्य दलात १४ वष्रे सेवा बजावली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे पाíथव आज सायंकाळी बेळगावजवळील सांबरा विमानतळावर आणण्यात येणार आहे. बेळगावातील लष्कराच्या तळावर पाíथव ठेवण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी मोटारीने त्यांचे पाíथव घरी आणले जाणार आहे. कुटुंबीयांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर सुशोभित वाहनातून मिरवणूक काढली जाणार आहे. मंगळवारी गावातील ज्या शाळेत त्यांचे शिक्षण झाले त्या फुले विद्यालयाच्या पटांगणात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ग्रामस्थांकडून आज त्याचे नियोजन सुरू होते. चंदगडचे तहसीलदार आप्पासाहेब सिमदर, पोलीस निरीक्षक महावीर सकळे यांनी या तयारीची पाहणी केली. गावात ‘शहीद राजेंद्र तुपारे तुझे सलाम ’असे मजकूर असलेले शंभरहून अधिक फलक लावण्याचे नियोजन सुरू होते. गावाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत वाहनतळाची सोय केली आहे.