कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी तिन्ही मंत्र्यांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करताना विजयाचा दावा केला. तसेच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीयांनी सहकार्य करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली. बँकेचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांनी सागर तालुक्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासमवेत तालुक्यातील प्रमुख नेतेमंडळी होती. कागल तालुक्यातील नेते एकत्र आले आहेत त्यांच्याकडे ९५ टक्के मतदान असल्याने निवडून येऊ असा दावा मुश्रीफ यांनी केला. जिल्ह्यातील सर्व घटकांशी चर्चा करून निवडणूक बिनविरोध होण्यासाठी एकोपा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

विजयाचा दावा

पालक मंत्री सतेज पाटील यांनी गगनबावडा तालुक्यातून अर्ज दाखल केला. ६६ पैकी ४९ सेवासंस्थाधारक आपल्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले. सोबत त्यांनी फेटा बांधून ठराव धारक अर्ज दाखल करण्यासाठी आणले होते.तसेच शिरोळ तालुक्यातील १११ठराव धारकांना सोबत घेऊन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांनी अर्ज भरला.