कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तातडीने कोल्हापूरकडे लक्ष पुरवले आहे. ते सोमवारी दिवसभर जिल्ह्याच्या विविध ठिकाणी पूरस्थितीची पाहणी करून आढावा बैठक घेणार आहेत. पूरग्रस्तांना दिलासा मिळावा अशी कृती पालकमंत्री व शासनाने करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी व धरणातील पाणीसाठा वाढत चालला आहे. पंचगंगा नदीने ३९ फूट ही इशारा पातळी पहाटे ओलांडली. दिवसभरात त्यामध्ये आणखी एक फुटाने वाढ झाली आहे. पंचगंगा धोका पातळीकडे सरकत आहे. तर कृष्णा नदीच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पूरस्थिती लक्षात घेऊन सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत आता शासनही दक्ष झाले आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

हेही वाचा >>> कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला, पंचगंगा नदीने ओलांडली इशारा पातळी; रस्ते बंद, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

दीपक केसरकर यांचा दौरा

सोमवार दुपारी शिरोळ येथील पूरपरिस्थितीची पाहणी व आढावा.

इचलकरंजी येथे पूरपरिस्थितीची पाहणी व आढावा.

हातकणंगले येथे पूरपरिस्थितीची पाहणी व आढावा.

कोल्हापूर शहरातील पूरपरिस्थितीची पाहणी व आढावा.