कोल्हापूर : गेले पाच दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने आता उघडीप दिली आहे. पंचगंगा धोका पातळीवरून वाहू लागल्याने पूरसदृश स्थितीने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पंचगंगा धोका पातळीच्या आत वाहू लागल्याने पुराचा धोका टळताना दिसत आहे. जिल्ह्यात अद्यापही ५० मार्गांवरील वाहतूक बंद असून, ४६ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात कालपासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत घट होत असून, पूरबाधितांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ५.७ मिमी पाऊस झाला आहे. दरम्यान जिल्ह्यात पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून अनेक मार्गही अद्याप बंद आहेत.

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग सुरू आहेत. आठ राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग ३२, इतर जिल्हा मार्ग १६ आणि ग्रामीण मार्ग ३४ असे एकूण ५० रस्ते बंधाऱ्यावर, रस्त्यावर पाणी आल्यामुळे बंद आहेत. पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू आहे.

घरांची पडझड

जिल्ह्यात पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. पूर्णतः पडलेली घरे – पक्की घरे व कच्ची घरे – चार, अंशत: पडलेली घरे- चार, कच्ची घरे- ९६३, बाधित गोठ्यांची संख्या – ६९.

जीवितहानी/ मृत व्यक्ती- ४, मृत दुधाळ जनावरे- ७, खासगी मालमत्ता- १०३३.

स्थलांतरीत कुटुंब

पावसाचा जोर वाढल्याने कोल्हापूर शहरासह जिल्हाभरात काही कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. त्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात ४६ लोकांचा समावेश आहे. पाऊस कमी झाल्याने या लोकांना दिलासा मिळाला आहे. गेले पाच दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने आता उघडीप दिली आहे. पंचगंगा धोका पातळीवरून वाहू लागल्याने पूरसदृश स्थितीने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पंचगंगा धोका पातळीच्या आत वाहू लागल्याने पुराचा धोका टळताना दिसत आहे. जिल्ह्यात अद्यापही ५० मार्गांवरील वाहतूक बंद असून, ४६ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात कालपासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत घट होत असून, पूरबाधितांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ५.७ मिमी पाऊस झाला आहे.