कोल्हापूर : कर्नाटक शासनाने अलमट्टी धरणाची उंची पाच मीटर वाढवून ती ५२४ मीटर करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात महापुराची भीषणता वाढणार असल्याने या धरणउंची वाढीविरोधात मंगळवारी कुरुंदवाड येथे कर्नाटक शासनाचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. पुतळा जाळताना आंदोलक व पोलिसांच्यात झटापट झाली. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची शाहू विकास आघाडी व यड्रावकर प्रेमी यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा : कोल्हापूर : पुरात वाहून गेलेल्या मृतदेहाचे अवशेष चार महिन्यांनंतर आढळले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अलमट्टी धरणाची उंची सध्या ५१९ मीटर आहे. यामुळे कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांना महापुराचा फटका बसत आहे. त्याला कारणीभूत अलमट्टी धरणाची वाढती उंची जबाबदार असल्याचे मत आहे. अलमट्टीची उंची वाढविली गेली, तर महापुराचा भयंकर फटका बसणार असल्याने महाराष्ट्र शासनाने उंची वाढविण्यापासून कर्नाटक शासनाला रोखावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. कर्नाटक शासनाने ५२४ मीटरपर्यंत उंची वाढवण्याच्या घाट घातला आहे. त्याचा निषेध म्हणून आज कुरुंदवाड येथे कर्नाटक शासनाचा पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला. दादा पाटील, शरद आलाशे, विश्वास बालीघाटे, उदय डांगे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.