कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे दोन दिवस उरले असताना निकाल नेमका कसा लागणार याची उत्सुकता वाढली आहे. निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याची चौका चौकात, गावगाड्यात गप्पांचा फड रंगला असून मोठ्या रकमेच्या पैजा लागल्या आहेत.

कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात जिल्ह्यात मतदान होऊन तीन आठवडे झाले. निकाल जवळ येईल तशी याच विषयाभोवती अहोरात्र चर्चा फिरत आहे. चहाचे गाडे, बाजारहाट, कार्यालय, गप्पा मारण्यासाठी जमायचे ठिकाण अशा सर्व ठिकाणी निकाल कसा असणार याचेच मोठे कुतूहल आहे.

हेही वाचा – रंकाळा तलावात पुन्हा मृत माशांचा खच; कोल्हापूर महापालिका यंत्रणा सुस्तच

पैजा जपूनच

दुसरीकडे सट्टा बाजारात कोणाला काय भाव आहे याचाही अंदाज घेतला जात आहे. त्यातूनच उमेदवार कोणता उमेदवार निवडून येणार यावरून मोठ्या रकमेच्या पैजा लागल्या आहेत. एका लाखाच्या पैजेवर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे अशा स्वरुपाच्या पैजा लागत असल्या तरी त्याची चर्चा होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

हेही वाचा – जागतिक दूध दिन: दुधाळ जनावरांच्या तब्बेतीची देखभाल करणारा प्रकल्प इचलकरंजीतील विद्यार्थ्यांकडून विकसित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उमेदवारांना धाकधूक

जिल्ह्यात याही वेळी मतदानाची टक्केवारी वाढली आहे. ७० टक्केपेक्षा अधिक मतदान झाले असल्याने वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर या चर्चेला तोंड फुटले आहे. त्याचे वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात असल्याने महायुती तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्येही धाकधूक निर्माण झाली आहे.