साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी मूर्तीची मोठ्या प्रमाणावर झीज होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी केली.हे अधिकारी दोन दिवसात यासंबधीचा अहवाल पुरातत्व विभागाकडे पाठवणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्री महालक्ष्मी मंदिरातील मूर्तीची पारंपरिक पुजेमुळे गेल्या काही वर्षापूर्वी पासून  झीज झाली आहे. मूर्तीवर पुरातत्व खात्याकडून वज्रलेप आणि रासायनिक प्रक्रिया करून मूर्ती संवर्धन करण्याचे काम सुरू आहे. तरीही मूर्तीची झीज होत आहेच.  ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने होत असल्याची शंका निर्माण झाली आहे.

हेही वाचा >>> कोल्हापुरात औषध दुकानात सीसीटीव्ही बसविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

याची दखल घेत आज पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंदिरला भेट दिली. त्यांनी अर्धा तास मूर्तीची पाहणी केली.मूर्तीची छायाचित्रे देखील घेतली. पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ.विलास वाहने यांनी मूर्तीची पाहणी केली आहे. जिल्हाधिकारी यांना भेटून दोन दिवसात अहवाल पाठवणार असल्याचे सांगितले. मंदिर अभ्यासक ऍड. प्रसन्न मालेकर यांनी यापूर्वी देखील पुरातत्व विभागाकडून पाहणी केली. केवळ अहवाल पाठवू असे सांगितले जाते. यावर ठोस उपाययोजना व्हावी , अशी अपेक्षा व्यक्त केली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inspection report of mahalakshmi idol will be sent to archeology department in two days zws
First published on: 28-02-2023 at 21:05 IST