कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला शनिवारी पावसाने झोडपून काढले. संततधार पावसामुळे भाविक, पर्यटकांची तारांबळ उडाली. पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे इचलकरंजीत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पिकांमध्ये पाणी घुसल्याने नुकसान होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात नवरात्रीच्या आधीपासून पावसाने दडी मारली होती. काल रात्रीपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागाला पावसाने झोडपून काढले आहे. पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत.
भाविकांचे हाल

जिल्ह्यात नवरात्रीमध्ये करवीर निवासिनी महालक्ष्मी व दख्खनचा राजा जोतिबा या तीर्थक्षेत्री भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पंचमीच्या निमित्ताने भाविक अधिक असतात. परंतु, मुसळधार पावसामुळे भाविकांना हाल सहन करावे लागले. छत्री, रेनकोट साहित्याचा आसरा घेत भाविक मंदिरात येत होते. दरम्यान कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे इचलकरंजीत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पिकांमध्ये पाणी घुसल्याने नुकसान होत आहे.

यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस मे महिन्याच्या १० तारखेपासूनच सुरू झाला. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खरिपाचा पेराही केला. हंगाम चांगला लाभणार असे वाटू लागल्याने खरिपातील बाजरी, मका, कांदा, सोयाबीन यांसह कडधान्याची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात कमी अधिक पाऊस पडला असल्याने खरीप पिकेही चांगली साधली होती. सप्टेंबरमध्ये खरिपाची काढणी केल्यानंतर रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई या पिकांची पेरणी करायची या तयारीत बळीराजा असतानाच परतीच्या पावसाने या परिसरात धुमाकूळ घातला. जिल्ह्यात उसाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र गेल्या तीन महिन्यापासूनच्या संततधार पावसामुळे उसाच्या शेतात कायम पाणी साठून राहिलेले असल्यामुळे त्याचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान सध्या परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असून, ऐनभरात आलेल्या नवरात्रोत्सवात या पावसाने निराशा पसरली आहे. नवरात्रोत्सवातील दांडिया, गरबा उत्साहात सुरू असताना, आता महाप्रसादाच्या पंगती उठणार होत्या. पण, अशातच धो- धो पावसाने विघ्न आणले आहे. त्यात लोकांच्या उत्साहावर पावसाने पाणी फिरवले आहे. जिल्ह्यात नवरात्रीमध्ये करवीर निवासिनी महालक्ष्मी व दख्खनचा राजा जोतिबा या तीर्थक्षेत्री भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पंचमीच्या निमित्ताने भाविक अधिक असतात. परंतु, मुसळधार पावसामुळे भाविकांना हाल सहन करावे लागले. दरम्यान जिल्ह्यातील पंचगंगेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत.