कोल्हापूर : दुधाच्या मापात घोळ घालणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ७० केंद्रांवर वैध मापन शास्त्र विभागाने कारवाई केली आहे. दुधाच्या संकलन केंद्रात १० ग्रॅम अचूकतेचे तोलन उपकरणाचा वापर न करणारे केंद्र कारवाईच्या कचाट्यात सापडली असल्याचे शुक्रवारी सांगण्यात आले.

जिल्ह्यातील अनेक दुध संकलन केंद्रावर दुध खरेदी / विक्री करताना सुलभता यावी यासाठी इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणांचा वापर केला जातो. दुध मापनामध्ये अधिक अचुकता येण्यासाठी इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणांचा वापर केला जातो. त्या सर्व दुध संकलन केंद्रात १० ग्रॅम अचुकतेचे तोलन उपकरणांचा वापर करणे १ जानेवारी पासून बंधनकारक केलेले आहे. तरी देखील काही दुध संकलन केंद्रावर १०० ग्रॅम अचूकतेचे तोलन उपकरणे वापरात असल्याच्या तक्रारी वैध मापन शास्त्र कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या.

हेही वाचा >>>लाच प्रकरणी कोल्हापुरात वनपाल,वनरक्षक रंगेहात पकडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेकायदेशीर बाबी कोणत्या ?

तपासणी मोहिम राबविली असता ७० दुध संकलन केंद्रावर कारवाई करण्यात आलेली आहे. शासन आदेशानुसार १० ग्रॅम अचूकतेची तोलन उपकरणे न वापरणे, वजन मापे व तोलन उपकरणांची विहित मुदतीत फेरपडताळणी न करता वापर करणे, वजन काट्यांमध्ये अनाधिकृतपणे फेरफार करणे व जास्त दुध घेऊन शेतकऱ्यांना कमी मोबदला देणे अशा बेकायदेशीर बाबी आढळून आल्याने गुन्हे नोंदविण्यात आले असल्याचे वैध मापन शास्त्राचे उप नियंत्रक द. प्र. पवार यांनी सांगितले.