लोकसत्ता प्रतिनिधी

कोल्हापूर: प्रदेश भाजपच्या नूतन कार्यकारिणी मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १७ जणांची वर्णी लागली आहे. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचे उपाध्यक्ष पद कायम असून देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांना चिटणीसपद देण्यात आले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी जम्बो प्रदेश कार्यकारणी जाहीर केली. कोल्हापूर जिल्ह्याला लक्षणीय स्थान मिळाले आहे.

आणखी वाचा- अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल; राजू शेट्टी यांचा रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना इशारा; शेट्टी बारसू लढ्याला पाठिंबा द्यायला जाणारच

नव्या जुन्याचा मेळ

त्यामध्ये नव्या जुन्याचा मेळ घालण्यात आला आहे. संधी मिळालेले अन्य सदस्य याप्रमाणे – प्रदेश कार्यकारिणी सदस्य – संदीप कुंभार, सचिन तोडकर, डॉ. अजय चौगले, संतोष चौधरी. विशेष निमंत्रित – हिंदुराव शेळके, बाबा देसाई, संग्राम कुपेकर. निमंत्रित सदस्य – राहूल चिकोडे, अमल महाडिक, महेश जाधव, संदीप देसाई, विजयेंद्र माने, डॉ. अरविंद माने, संदीप कुंभार, पृथ्वीराज यादव.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलांकडे दुर्लक्ष

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांना स्थान मिळालेले. शहर जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांनी महिलांना संधी द्यावी अशी मागणी केली होती. मात्र ती दुर्लक्षित राहिल्याचे आज दिसून आले.