कोल्हापूर : ऊस दराचा प्रश्न तापला असताना उद्या मंत्रालयात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयात बैठक आयोजित केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या हंगामासाठी प्रति टन ४०० रुपये आणि चालू गळीत हंगामासाठी एक रकमी ३५०० रुपये मिळावेत यासाठी आंदोलन सुरू केले आहे. यामुळे तीन आठवडे उसाचे गाळप थांबले आहे.

आणखी वाचा-कोल्हापूर : साखर कारखान्यांना ऊस देण्यासाठी शिरोळमध्ये आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऊस दरावर तोडगा उद्या बैठक आयोजित केली असून पालकमंत्री हसन मुश्रीफ, शेतकरी नेते राजू शेट्टी,सहकार सचिव,साखर आयुक्त, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील यांना निमंत्रित केले आहे.