कोल्हापूर : शिवसेना ही सातत्याने महिलांच्या सक्षमीकरण आणि सुरक्षिततेसाठी काम करत आली आहे. सध्या शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रुपाने असल्याने महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत, असे प्रतिपादन शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी केले.

शिवसेनेचे दोन दिवसाचे महाअधिवेशन येथे आयोजित केले आहे. यावेळी त्या महिला व युवा सक्षमीकरण या विषयावर बोलत होत्या. यावेळी शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या मांडणीवेळी डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे महिलांसाठी काम करणारे सरकार आहे. महिलांना बसमध्ये अर्धे तिकीट, उच्च शिक्षणात मुलींना मोफत शिक्षण, नवीन उद्योग उभारण्यासाठी महिलांना सवलत, महिला बचतगट यांना विविध योजनांच्या मार्फत मदत उपलब्ध करुन त्यांना सक्षमीकरण करण्याचे सातत्याने महिलांना न्याय मिळविण्याचे काम होताना दिसत आहे.

हेही वाचा – पिंपरी : मोटारीच्या छतावर बसून ‘स्टंटबाजी’ करणारे दोघे अटकेत

मुख्यमंत्री शिंदे हे कोणत्याही कामाला नकार देत नाहीत. पांढरे रेशनकार्ड धारक महिलांना देखील आनंदाचा शिधा देण्यासाठी सूचना शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची आठवण डॉ. गोऱ्हे यांनी करुन दिली. त्यामुळे शिंदे हे खरे लोकांसाठी काम करणारे नेते असून हिंदूहृदयसम्राट यांचे खरे वारसदार असल्याचे देखील डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

हेही वाचा – पिंपरी : मराठा आंदोलकांनी किवळेत रस्ता रोखला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलांसाठी पाच कलमी कार्यक्रम

या अधिवेशनातून जात असताना महिलांनी महिलांची व अल्पवयीन मुलींची सुरक्षितता, आरोग्य सुरक्षितता, डीप क्लीन शहर (स्वछता), राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर, स्थानिक नागरिक, कार्यकर्त्या, पदाधिकारी यांच्या सोबत प्रत्यक्ष संवाद हा पाच कलमी कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचे काम सुरु करावे, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.