कोल्हापूर : सध्याचे पालकमंत्री हे पर्यटन मंत्री असल्या सारखे वागत आहेत. त्यांच्या निष्क्रियपणामुळे कार्यकर्त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी सारख्या पदांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे, अशी टीका कोल्हापुरात भाजपने केली आहे.

विशेष कार्यकारी अधिकारीपद नियुक्ती मध्ये पालकमंत्र्यांनी लक्ष घातले नाही. भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केलेले अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत भाजप शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांची भेट घेवून या प्रक्रियेतील वेळकाढूपणा सुरु असल्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करून जाब विचारला.

आणखी वाचा-कोल्हापूरातील लोकसभेच्या एका मतदारसंघावर भाजपचा दावा; ठाणे,कल्याण पाठोपाठ आणखी आग्रही मागणी

प्रदेश सचिव महेश जाधव, भाजप महानगर जिल्हा अध्यक्ष राहुल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव आदींनी पालकमंत्र्यांबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रशासनाची ढिलाई चव्हाट्यावर

जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह विभाग अजूनही २०१५ च्या शासन निणर्यानुसार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीचे काम करत असल्याचे दिसून आल्यानंतर शिष्टमंडळाच्याने जिल्हाधिकारी कार्यालयासाठी मे महिन्यातील अद्यावत निर्णयाची प्रत सुपूर्त करून प्रशासनाची ढिलाई चव्हाट्यावर आणली. सुधारित निर्णया नुसार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीचा अधिकार पालकमंत्री व स्थानिक प्रशासनाला असल्याने नियुक्ती लवकर झाल्या पाहिजेत अशी जोरदार मागणी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी पालकमंत्र्यांचे पत्र मिळताच नियुक्त्या तात्काळ करण्याचे आश्वासन दिले.