कोल्हापूर : पंजाबमधील जागा खरेदी-विक्री करणाऱ्या कार्यालयात दरोडा टाकून एक कोटीची लूट करून पळून जाणाऱ्या चार आरोपींना रविवारी कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केले.

हेही वाचा >>>> देहूत ३२९ दिंड्यांसह वैष्णवांचा मेळा; जगद्गुरु संत तुकोबांचा पालखी प्रस्थान कसं होणार? वाचा…

पंजाब राज्यातील डेराबासी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जागा खरेदी-विक्री व्यवसायाच्या कार्यालयावर दरोडा टाकण्यात आला होता. या दरोड्यात कार्यालयातील एक कोटीची रक्कम लुटण्यात आली होती. तसेच तेथील एका व्यक्तीला गोळ्या झाडून जखमी करण्यात आले होते. याबाबत तेथील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा >>>> बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत; पतीच्या खात्यातील ४० लाख लांबविले; पत्नी, बँक व्यवस्थापकासह पाच जणांवर गुन्हा

या गुन्ह्यातील चार आरोपी पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गाने कोल्हापूरच्या दिशेने आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, कागलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, आजरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हरुगडे यांनी तपास केला.

हेही वाचा >>>> “नवऱ्याशी घटस्फोट घेऊन लग्न करेन, पण…”; सांगलीतील पायलटला नोएडाच्या महिलेकडून ५९ लाखांना गंडा

हे आरोपी गोव्याकडे जात असताना त्यांना आजरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोखण्यात आले. मोटारीतील अभय प्रदीप सिंग (वय २०), आर्य नरेश जगला (वय २०), महिपल बलगीत जगरण (व३९) व सनी कृष्ण जगलान (वय १९, सर्व जिल्हा रा. पाणीपत) यांना पकडण्यात आले. पंजाब पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जसकमल शेख यांच्या पथकाकडे त्यांना सोपवण्यात आले.

हेही वाचा >>>> ‘आमची लढाई वाडा विरुद्ध गावगाडा, शेवटपर्यंत लढत राहू;’ हॉटेल थकित बील प्रकरणानंतर सदाभाऊ खोत यांचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही कामगिरी यशस्वी केल्याबद्दल तपास पथकातील अंमलदार सहाय्यक फौजदार बिरप्पा कोचरगी), राजेश आंबुलकर, निरंजन जाधव व अमोल पाटील यांना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.