कोल्हापूर : इचलकरंजी येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याने रात्री या हंगामासाठी प्रतिटन ३३०० रुपये दर जाहीर केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हा दर सर्वाधिक ठरला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

पंचगंगा सहकारी साखर कारखाना इचलकरंजी येथे आज सागर संभूशेटे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. यावर्षीची एफआरपी अधिक १०० रुपये मंजूर केले असल्याचे पत्र घेतल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार करून कोरोची, कबनूर, हातकणंगले, रांगोळी, रेंदाळ, रुई, इंगळी नांदणी या परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या गावातील ऊस तोडी बंद करून पंचगंगा कारखान्यावर यायला सुरुवात झाली.

आणखी वाचा-‘स्वाभिमानी’चे भांडण मिटले; पालकमंत्री मुश्रीफ यांचा सत्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेर कारखान्याचे अध्यक्ष पी. एन. पाटील आणि व्यवस्थापनाने ३२०० अधिक १०० असे एकूण ३३०० रुपये देण्याचे जाहीर केले. तसे पत्र देण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.