कोल्हापूर : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात दोन ठिकाणी जन औषधी केंद्रांचा ऑनलाईन उद्घाटन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी झाला.

शिरोळ तालुक्यात उदगाव विकास सेवा संस्था तसेच पन्हाळा तालुक्यात पोखले येथील श्री बलभीम विकास सेवा संस्था येथे हा कार्यक्रम पार पडला. पोखले येथील कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, सहकार आयुक्त अनिल कवडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी समीर शिंगटे, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – अवकाळी पावसाने कोल्हापूरला पुन्हा झोडपले

हेही वाचा – ‘बिद्री’ कारखान्याच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ- चंद्रकांत पाटील या मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उदगाव येथील कार्यक्रमास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, स्वाभिमानीचे नेते सावकार मादनाईक, संस्थेचे अध्यक्ष विजय कर्वे, सहाय्यक निबंधक अनिल नांद्रे आदी उपस्थित होते. बाजारातील ब्रँडेड कंपन्यांपेक्षा ७० ते ९० टक्के स्वस्त असणारी जन औषध केंद्रातील औषधे वापरावीत, असे आवाहन करण्यात आले.