हेरवाड ( ता शिरोळ) येथील अमीर बालेचंद नदाफ(वय.30 ) या युवकाचा सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील कोगनोळी येथे संशयास्पद मृत्यू झाल्याची तक्रार पत्नी फातिमा अमीर नदाफ भाऊ अकबर बालेचांद नदाफ यांनी  केल्यानंतर मंगळवारी पोलीस बंदोबस्तात कबर खुदाई करून मृतदेह बाहेर काढून वैद्यकीय अधिकारी डॉ.रश्मी जाधव यांच्या समोर शवविच्छेदन करून व्हिसेरा तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आला. तो वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मृत्यू की घातपात हे स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा >>> इचलकरंजीत मोर्चानंतर हातगाड्या जमावाचे लक्ष्य;तातडीने शांतता कमिटीचे आयोजन

हेरवाड येथील अमीर नदाफ याचे सहा महिन्यापूर्वी पत्नी फातिमा नदाफ याच्याशी वाद झाल्याने ती माहेरी इचलकरंजीला निघून गेली होती. याच घरगुती तणावातून अमीर नदाफ हा कोगनोळी तालुका कवठेमंकाळ येथे आपल्या अत्तीकडे 6 महिन्यापासून राहत होता. शनिवारी रात्री अमीर नदाफ याचा  हृदयविकाराचा धक्क्याने मृत्यू झाल्याचे अत्ते भाऊ सलीम दाऊद नदाफ(रा.कोगनोळी,कर्नाटक)याने सांगितले शनिवारी रात्री एक वाजता सुमारास अमीर याचा मृतदेह हेरवाड येथे त्याच्या मूळ गावी आणण्यात आले. रविवारी सकाळी मृत देहाचा दफनविधी करण्यात आला.

दरम्यान, अमीर नदाफ आणि सलीम नदाफ याच्या मध्ये शनिवारी सायंकाळी काही कारणाने वादावादी झाली होती. त्यानेच मारहाण केल्याने अमीरचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त करत भाऊ अकबर नदाफ आणि पत्नी फातिमा नदाफ यांनी अमीर याचा मृत्यू संशयास्पद असून याबाबत अकबर नदाफ याच्याविरुद्ध कवठेमहांकाळ पोलिसात तक्रार दिली होती.

हेही वाचा >>> हेर्ले येथील अनधिकृत प्रार्थनास्थळ पाडण्यास सुरुवात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तक्रारीच्या अनुषंगाने कवठेमहांकाळचे सहाय्याक पोलीस निरीक्षक सागर गोडे यांनी कुरुंदवाडचे पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांच्याशी संपर्क साधून कवठेमहांकाळचे नायब तहसिलदार संजय पवार यांच्या उपस्थितीत हेरवाड येथे दफन करण्यात आलेल्या मयत अमीर नदाफ याचा मृतदेह पुन्हा खुदाई करून काढून शवविच्छेदन करण्यासाठी सांगितले असता कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात मृतदेह कबरी बाहेर काढून आहे. त्याच ठिकाणी अब्दुललाट आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.रश्मी जाधव, आरोग्य अधिकारी प्रशांत माने, अभिजित भोसले यांच्या समक्ष शवविच्छेदन करण्यात आले. व्हिसेरा ताब्यात घेऊन सीपीआर रुग्णालय कोल्हापूरकडे पाठवण्यात आले आहे. कब्रस्तान परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे तनावपूर्ण वातावरण बनले होते.शवविच्छेदनाचा अहवाल येताच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे, सपोनि. सागर गोडे यांनी सांगितले.