कोल्हापूर जिल्हय़ात गेल्या दहा वर्षांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व काही नागरी सहकारी बँकांचे संचालक मंडळ गेल्या दहा वर्षांत गैरकारभारामुळे बरखास्त झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक व नागरी सहकारी बँकांच्या संचालकांना पुढील आठवडय़ात विभागीय सहनिबंधक नोटिसा लागू करणार आहेत.
जिल्हा बँकेचे २८ जणांचे संचालक मंडळ बरखास्त झाले होते. आमदार हसन मुश्रीफ हे राज्य बँकेच्या बरखास्त संचालक मंडळातही आहेत. २८पकी तीन मृत वगळता२५ संचालकांना कारवाईबाबत पुढील आठवडय़ात विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे नोटिसा लागू करणार आहेत. त्यामुळे संचालकांचे धाबे दणाणले आहेत. या वटहुकमामुळे जिल्हा बँकेच्या विद्यमान दहा संचालकांना दणका बसणार आहे. बरखास्त संचालक मंडळात असलेले उर्वरित २५ संचालकही अडचणीत आले आहेत. या दिग्गजांची साखर कारखाना, बँका, सूतगिरण्यांसह विविध सहकारी संस्थांमधील पदे धोक्यात आली आहेत.
नव्या अध्यादेशावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केल्यानंतर संपूर्ण सहकार क्षेत्रात खळबळ उडाली. कोल्हापूर जिल्हय़ात गेल्या दहा वर्षांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व काही नागरी सहकारी बँकांचे संचालक मंडळ बरखास्त झाले आहे. जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त होऊन त्यांच्यावर नुकसानभरपाईसाठी जबाबदारी निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. याबाबतच्या नोटिसांना संचालकांनी न्यायालयात दाद मागितली आहे. वटहुकमाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार तयार केली आहे. जिल्हा बँकेचे संचालकपद धोक्यात आलेच, पण त्याबरोबर इतर सहकारी संस्थांमधील पदेही धोक्यात येणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jan 2016 रोजी प्रकाशित
बरखास्त संचालक मंडळात असलेले उर्वरित २५ संचालकही अडचणीत
सहकारी बँकांचे संचालक मंडळ गैरकारभारामुळे बरखास्त
Written by लोकसत्ता टीम

First published on: 24-01-2016 at 03:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Problem to 25 remaining directors of dismissed director board