विशाळगड जातीय तणाव प्रकरणाला संभाजी राजे छत्रपती हे जबाबदार आहेत, असा आरोप सोमवारी येथे मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी ही करण्यात आली. विशाळगड , गजापूर येथे काल मुस्लिम समाजावर अत्याचार करण्यात आला याबाबतचा पाढा आज मुस्लिम बोर्डिंगच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वाचला.

हेही वाचा >>> विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात; हिंसक घटना प्रकरणी २१ आरोपींना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशाळगड अतिक्रमण मोर्चाचे आंदोलनाला समाजकंटकांनी हिंसक वळण दिले. गजापूर , मुसलमाना वाडी येथील अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील घरांवर, प्रार्थनास्थळ दगडफेक, तोडफोड, महिलां मुले यांच्यावर यांना क्रूर मारहाण ,अत्याचार करण्यात आले. हे कोल्हापूर पुरोगामी कोल्हापूरला अशोभनीय आहे. या समाजकंटकांचे नेतृत्व करणारे संभाजी राजे व तसेच दंगलीचे सूत्रधार पुण्याचा रवींद्र  पडवळ यांच्याकडून नियोजन करून रसद पुरवली गेली. जमावबंदी आदेश असताना मोर्चा निघाला कसा तसेच अतिक्रमण काढण्यासंदर्भात मोर्चाचे नियोजन केले असताना दर्ग्यावर हल्ला झाला का, गजापूरमध्ये अतिक्रमणाचा मुद्दाम असताना मुस्लिम समाजावर अत्याचार करण्यात आला. पोलीस, पत्रकारांना धमकावण्याचे  प्रकार घडले. यामुळे या घटनेमुळे कोल्हापुरात जातीय तणाव झाला असून याला संभाजी राजे जबाबदार असल्याने अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे .निवेदनावर समाजाचे अध्यक्ष गणी आजरेकर, कादर मलबारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा नामोल्लेख आहे.