कोल्हापूर येथील वरिष्ठ पत्रकार प्रभाकर कुलकर्णी यांचे रविवारी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. व्यासंगी पत्रकार हरपला, अशा भावना पत्रकारांनी व्यक्त केल्या.सुमारे सहा दशकांपेक्षा अधिक काळ पत्रकारिता केलेल्या प्रभाकर यांचे इंग्रजी भाषेवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. औद्योगिक विषयावरही ते अधिकार वाणीने लिहायचे. सकाळ मधून पत्रकारिता सुरू केली. त्यानंतर विशाल सयाद्री, केसरी, नवशक्ती , फ्री प्रेस जर्नल , इंडीयन एक्स्प्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, द इकॉमिक टाइम्स, महाराष्ट्र हेरॉल्ड , द इंडिपेंडंट , स्क्रीन , द हिंदू, बिझनेस स्टँडर्ड, द हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्रामध्ये प्रतिनिधी म्हणून काम केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>कोल्हापुरात उसाला चांगला दर ; राज्यात अन्यत्र शेतकऱ्यांना ६०० ते ७०० रुपये कमी भाव

पुढारी, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकप्रभा, सामना,संपदा, डेक्कन हेरॉल्ड, द टेलेग्राफ, डे आफ्टर , द ट्रिबून, फिल्फेअर, फेमिना यामध्ये स्तंभ लेखन केले.पहिली पत्रकार गृहनिर्माण संस्था उभी करण्यासह त्यांनी अनेक सामाजिक संस्थांमध्ये योगदान दिले. संगीत शाहू रजनी चालू करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. कोल्हापूर श्रमिक पत्रकार संघ तसेच कोल्हापूर सिने पत्रकार संघाचे ते अध्यक्ष होते. करवीर तालुका पत्रकार संघ तर्फे जीवन गौरव पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. त्यांच्या पश्चात एक मुलगा,दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior journalist prabhakar kulkarni passed away amy
First published on: 06-11-2022 at 19:29 IST