कोल्हापूर : आर्थिक देवघेवीच्या व्यवहारातून तामगाव ( ता. करवीर) येथील अभिषेक स्पिनिंग मिलमध्ये माजी आमदार प्रकाश आवाडे समर्थकांनी गिरणीत घुसण्याचा प्रयत्न केला. मिलमधील कर्मचारी व समर्थक यांच्यात वाद झाला. अभिषेक स्पिनिंग मिलमधील येणे रकमेवरून प्रकाश आवाडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी आदल्या दिवशी मिलसमोर येऊन मला कोणी रोखू शकत नाही, असे म्हणत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याची चित्रफीत अग्रेषित झाली होती. तर दुसऱ्या दिवशी या गिरणीसमोर वाडे समर्थक जमले होत. त्यांनी जेसीबी व मोठी वाहने येथे लावली होती.

त्यांनी मिलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यास कामगारांनी विरोध केला. पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला. सायंकाळी सूतगिरणीचे सूत्रधार व आवाडे यांच्यात दूरध्वनीवरून संवाद झाला. व्यवहारातून मार्ग काढला जात असल्याची चर्चा सुरू होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाद काय?

अभिषेक स्पिनिंग मिलचे भागीदार अण्णासाहेब मोहिते यांच्याकडे प्रकाश आवाडे यांनी सन २०१९ पूर्वी सुमारे सात कोटी रुपये गुंतवल्याचे सांगितले जाते. मात्र मिल सुरू झाली नाही. रक्कम मिळत नसल्याने आवाडे आक्रमक झाल्याचे सांगितले जाते.