पहिल्या उचलीतील थकीत असलेली एफआरपी त्वरित द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात शुक्रवारी शरद, पंचगंगा, जवाहर, गुरुदत्त व दत्त शिरोळ या साखर कारखान्यांवर संघटनेच्या वतीने शिष्टमंडळ जाऊन निवेदन देण्यात आले.
चालू गळीत हंगाम २०१५-१६ सुरू असताना देशांतर्गत व जागतिक बाजारपेठेतील साखरेचे दर पडलेले होते. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना तसेच साखरेचे दर कमी होते. म्हणून तसेच राज्यातील सहकारी साखर कारखानदारी अडचणीत सापडलेली होती. पाऊस नसल्याने हातातोंडाशी आलेले पीक वाया जाऊ नये म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, संघटनेचे पदाधिकारी, साखर आयुक्त व राज्याचे मुख्यमंत्री यांच्या चर्चा करून एकरकमी एफआरपीचा मुद्दा बाजूला ठेवून तडजोड करीत ८०-२० टक्केचा फॉम्र्युला मंजूर केला होता. सध्या देशातील व परदेशातील साखरेचे दर सुधारलेले आहेत. सध्या साखरेचे भाव ३७ रुपयांच्या घरात गेले आहेत. म्हणजे जवळपास १० रुपये प्रतिकिलो साखरेच्या दरात वाढ झालेली आहे. एफआरपी देणे बंधनकारक आहेच, शिवाय याहूनही अधिक दर देणे साखर कारखान्यांना शक्य होणार आहे.
साखर गळीत हंगाम सुरू होऊन ५ महिने झाले आहेत. आपल्या साखर कारखान्याने ८० टक्के रक्कम अदा केलेली आहे. शेतकऱ्यांची आíथक परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. त्वरित उर्वरित रक्कम ऊस बिल अदा न झाल्यास ३ एप्रिल रोजी कोल्हापूर येथे कोल्हापूर व सांगली जिल्हय़ातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. पहिल्या उचलीमधील उर्वरित २० टक्के एफआरपी त्वरित द्यावी अशी मागणी करण्यात आली. या वेळी राज्य कार्यकारिणी सदस्य अण्णा चौगुले, जि.प. सदस्य सावकर मादनाईक, रामचंद्र फुलारे, प्रकाश गावडे, मििलद साखरपे, शिवाजी माने, शैलेश चौगुले, सचिन िशदे, वैभव कांबळे, संपत पवार आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Apr 2016 रोजी प्रकाशित
‘एफआरपी’ची उर्वरित रक्कम देण्याची ‘स्वाभिमानी’ची मागणी
शरद, पंचगंगा, जवाहर, गुरुदत्त व दत्त शिरोळ या साखर कारखान्यांवर संघटनेच्या वतीने निवेदन
Written by लोकसत्ता टीम

First published on: 02-04-2016 at 03:35 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swabhimani demands remaining amount of the frp