कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदीमध्ये मोटार कोसळण्याचे प्रकार दोन ठिकाणी घडले आहेत. बचाव पथकाने प्रवाशांसह मोटार बाहेर काढण्यात यश मिळवले आहे.

शिरोळ तालुक्यातील दूधगंगा नदीला पूर आला आहे. कर्नाटक राज्यातील एकसंबा गावातून एक मोटर शिरोळ तालुक्यातील दानवाड गावाकडे येत होती. दूधगंगा नदीच्या पुलावर चालकाला दाट धुक्यामुळे रस्त्याचा नीट अंदाज आला नाही. चालकासह मोटार नदीत कोसळली. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी नदीपात्रात उतरून दोरखंड बांधून मोटर व चालकाला बाहेर काढले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंदगड मध्येही अपघात
चंदगड तालुक्यातील हांजगोळ नदीवरील पुलावर मोटार नदीत कोसळली. समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालक मोटर चालक कलाप्पा बाणेक यांचे नियंत्रण सुटले. पत्नीसह दोघेजण मोटारीतून नदीत कोसळले. उपसरपंच रामलिंग गुरव यांच्यासह सहकाऱ्यांनी तात्काळ धावून घेऊन मोटारीसह उभयतांना बाहेर काढले.