देहरादूनच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात अफगाणिस्तानने आयर्लंडवर मात करत ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. या सामन्यात अफगाणिस्तानने टी-२० क्रिकेटमधल्या सर्वोत्तम धावसंख्येची नोंद केली. ३ गड्यांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानचा संघ २७८ धावांपर्यंत मजल मारु शकला. या सामन्यात सलामीवीर हजरउल्ला झजाईने ६२ चेंडूत १६२ धावांची नाबाद आक्रमक खेळी केली. या खेळीत हजरतउल्लाने तब्बल १६ षटकार ठोकत आयर्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली.

याआधी ऑस्ट्रेलियाच्या फिंचच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम जमा होता. २०१३ साली फिंचने इंग्लंडविरुद्ध टी-२० सामन्यात १४ षटकार लगावले होते. हजरउल्लाला दुसऱ्या बाजूने उस्मान घानीने ७३ धावांची खेळी करत चांगली साथ दिली. अफगाणिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ १९४ धावांपर्यंत मजल मारु शकला.

अवश्य वाचा – आयर्लंडला ‘अफगाणी’ तडका, टी-२० सामन्यातील सर्वोच्च धावसंख्येची नोंद