ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलनं पहिल्या एकदिवसीय सामन्यात १९ चेंडूत झटपट ४५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान मॅक्सवेलनं पाच उतुंग षटकार लगावले. मॅक्सवेलच्या या तुफानी खेळीनंतर अनेकांनी पंजाब आणि राहुलला ट्रोल केलं. यामध्ये पंजाब संघाचे कोच वसीम जाफर आणि अष्टपैलू खेळाडू जिमी निशीमने हात धुवून घेतला. मॅक्सवेलला यंदा आयपीएलमध्ये आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही.

मॅक्सवेलच्या तुफानी खेळीनतर सोशल मीडियावर के. राहुलला ट्रोल करणारं एक मिम्स वरुण नावाच्या व्यक्तीनं ट्विट केलं होतं. यामध्ये त्यानं म्हटलं होतं की, ‘मॅक्सवेलनं आपल्या देशाकडून केलेली तुफानी फलंदाजी पाहाता राहुल.’ वरुण याच्या ट्विटला रिट्विट करत जिमी निशीम यानं मॅक्सवेलची फिरकी घेतली. मॅक्सवलनेही जिमी निशीमला हाजरजबाबी उत्तर देताना म्हटलं की, ‘फलंदाजी करताना मी राहुलची माफी मागितली आहे.’

मॅक्सवेलनं पहिल्या एकदिवसीय सामन्यात १९ चेंडूत पाच चौकार आणि चार चौकारांच्या मदतीनं झटपट ४५ धावा चोपल्या होत्या. मॅक्सवेलच्या तुफानी फलंदाजीमुळे अखेरच्या २० षटकांत ऑस्ट्रेलियाला वेगानं धावा जमवण्यात यश आलं होतं. मात्र, युएईमध्ये राहुलच्या नेतृत्वात पंजाबकडून खेळताना मॅक्सवेलला आपली छाप सोडता आली नव्हती. तेराव्या हंगामात मॅक्सवला ११ सामन्यात फक्त १०८ धावा करता आल्या. आर्श्चयाची बाब म्हणजे मॅक्सवेलसारख्या पिंच हिटलरा एकही षटकार लगावता आला नव्हता. पण देशाकडून खेळताना मॅक्सवेलनं पहिल्याच सामन्यात ४५ धावांची धडाकेबाज खेळी केली.