भारतीय नेमबाज अपूर्वी चंडेला ही पुढील वर्षी होणा-या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. आयएसएसएफ विश्वकरंडक स्पर्धेत अपूर्वीने १० मी एअर रायफल प्रकारात कांस्यपदक पटकाविले आहे. अपूर्वीने १८५.६ गुण मिळवून तिसरे स्थान मिळविले. या प्रकारात पहिल्या सहा खेळाडूंमध्ये येणारे खेळाडू ऑलिंम्पिकसाठी पात्र ठरणार होते. क्रोएशियाच्या शान्जेना जेकिक हिने सुवर्ण (२०९.१) व सर्बियाच्या इव्हाना मॅक्सिमोव्हिक (२०७.७) हिने रौप्यपदक पटाकाविले.
नेमबाज जीतू राय याच्यानंतर रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणारी अपूर्वी ही दुसरी भारतीय नेमबाज आहे.