बांगलादेशच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शेख मुजीबउर रेहमान यांच्या जन्मशताब्दी निमिताने बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दोन सामन्यांचं आयोजन केलं आहे. Asia XI vs World XI हे दोन टी-२० सामने १८ आणि २१ मार्चला ढाका येथे खेळवले जातील. आयसीसीने या दोन्ही सामन्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दर्जा दिलेला आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघातील ४ खेळाडू सहभागी होणार असून या स्पर्धेसाठीही धोनीच्या नावाचा विचार करण्यात आलेला नाही.

IANS वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी विराट कोहली, शिखर धवन, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी या चार भारतीय खेळाडूंचं नाव पाठवलं आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने महेंद्रसिंह धोनीला या स्पर्धेत सहभागी होऊ द्यावं अशी मागणी केली होती. मात्र धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी पुनरागमन करणार याबद्दल साशंकता असल्यामुळे धोनीच्या नावाचा समावेश करण्यात आला नसल्याचं कळतंय.

विराट कोहली-मोहम्मद शमीसह…शिखर धवन आणि कुलदीप यादव हे खेळाडू या स्पर्धेत खेळतील

 

दरम्यान या सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडू सहभागी होणार नाहीयेत. केवळ याच अटीवर भारतीय खेळाडू स्पर्धेत खेळतील अशी अट बीसीसीआयने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला घातली होती. त्यामुळे मार्च महिन्यात होणारे हे दोन सामने किती रंगतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.