ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याला नुकत्याच पार पडलेल्या IPL 2020 च्या लिलावात १० कोटींच्या वर बोली लावून पंजाबने आपल्या संघात घेतले. त्याच्यावर अनेकांनी बोली लावली, पण पंजाबने यात बाजी मारली. पण सध्या मॅक्सवेल एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आहे. मॅक्सवेल कायम आपल्या धडाकेबाज खेळीसाठी प्रसिद्ध आहे. पण सध्या मैदानावरील नव्हे, तर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत आहे.

IPL 2020 : ‘या’ तारखेपासून होणार सुरूवात; पहिला सामना वानखेडेवर

सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग स्पर्धा सुरू आहे. याच स्पर्धेदरम्यान सोमवारी मॅक्सवेलने क्रिकेट मैदानाबाहेर एक कौतुकास्पद कृत्य केले. बिग बॅश लीगच्या (Big Bash League) १७ व्या सामन्यापूर्वी लॉन्सेस्टनमधील औरोरा स्टेडियमच्या बाहेर अचानक झुडुपांना आग लागली. त्यावेळी मॅक्सवेल तेथे उपस्थित होता. इतर कोणाच्याही मदतीची वाट न पाहता त्याने थेट स्वत:च आग विझवण्याचा प्रयत्न केला. सामन्यापूर्वी जेव्हा डेल स्टेन आणि ग्लेन मॅक्सवेल हे दोघेही एकत्र होते. त्यावेळी अचानक स्टेडियमच्या आवाराबाहेरील कोरड्या गवतात आग लागली. मॅक्सवेल त्वरित आगीच्या दिशेने पळाला आणि त्याने अग्निशमन यंत्र हाती घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला.

Ranji Trophy : लाजिरवाण्या पराभवानंतर मुंबईच्या संघात बदल, ‘या’ खेळाडूला संधी

मुलगी आरती करते, म्हणून टीव्हीच फोडून टाकला – शाहिद आफ्रिदी

या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ स्टेनने शूट केला आणि आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियामधील जंगलांच्या आगीने खळबळ उडाली आहे. आगीमुळे हजारो हेक्टर वनराई जळून खाक झाली आहे. या आगीत कोट्यवधी जनावरे मरण पावली आहेत. बऱ्याच जणांना त्यांची घरे गमावली लागली आहेत. आगीमुळे ऑस्ट्रेलियामध्ये श्र्वसनाचे त्रास होत आहेत. याच पार्श्वभूमीवर बिग बॅश लीगमधील एक सामनाही खराब हवामानामुळे रद्द करावा लागला होता.