ऑस्ट्रेलियन ओपनमधील मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या सानिया मिर्झा व तिचा सहकारी होरिआ टेकूला पराभवाचा सामना करावा लागला.
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सानिया व होरिआने चमकदार कामगिरी करत मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. यामुळे भारतीय टेनिसप्रेमींच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. रविवारी मेलबर्नमध्ये मिश्र दुहेरीचा अंतिम सामना पार पाडला. कॅनडाचा के डेनिअल नेस्टर आणि फ्रान्सच्या क्रिस्टीना मादेनोविक या जोडीने सानिया-होरिओचा ३-६, २-६ असा पराभव केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 26, 2014 4:50 am