बीसीसीआयने २०१८-१९ वर्षाकरता आपल्या खेळाडूंसाठी वार्षिक करार यादी जाहीर केली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही A+, A, B आणि C असे ४ प्रकार करण्यात आले असून, A+ प्रकारात विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या तीन खेळाडूंनाच जागा देण्यात आली आहे. मात्र गेल्या वर्षभरात खराब फॉर्ममुळे चर्चेत असलेल्या शिखर धवनचं करार यादीतलं स्थान घसरलं आहे. A+ मधून शिखर धवनला A प्रकारात स्थान देण्यात आलं आहे. मात्र याचवेळी २०१८ साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या ऋषभ पंतला A प्रकारात बढती देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीसीसीआयच्या श्रेणींना मिळणारं मानधन –
A+ – ७ कोटी, A – ५ कोटी, B – ३ कोटी, C – १ कोटी

A+ श्रेणीतले खेळाडू : विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा

A श्रेणीतले खेळाडू : रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंह धोनी, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, ऋषभ पंत

B श्रेणीतले खेळाडू : लोकेश राहुल, उमेश यादव, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या

C श्रेणीतले खेळाडू : केदार जाधव, दिनेश कार्तिक, अंबाती रायुडू, मनिष पांडे, हनुमा विहारी, खलिल अहमद, वृद्धीमान साहा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci contracts shikhar dhawan downgraded rishabh pant gets grade a central contract
First published on: 08-03-2019 at 10:18 IST