आशियाई चषकासाठी बीसीसीआयने आज भारतीय संघाची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे कर्णधार विराट कोहलीला या स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आलेली असून, रोहित शर्माकडे संघाचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे. याचसोबत शिखर धवनला संघाचा उप-कर्णधार म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. याचसोबत महाराष्ट्राच्या केदार जाधवनेही प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. तर खलिल अहमद या नवोदीत खेळाडूला भारतीय संघात जागा मिळाली आहे. १५ सप्टेंबरपासून युएईत आशिया चषक स्पर्धा खेळवली जाणार आहे.

 

आशिया चषकासाठी असा असेल भारताचा संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उप-कर्णधार), लोकेश राहुल, अंबाती रायडू, मनिष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, खलिल अहमद