भारताने ‘फिडे’ ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत पहिल्या दिवशी झिम्बाब्वे, व्हिएतनाम आणि उझबेकिस्तान यांना नमवत सलग तीन विजयांची नोंद केली.

भारताने पहिल्या लढतीत झिम्बाब्वेला ६-० असे सहज हरवले. मग व्हिएतनामवर ४-२ असा  आणि उझबेकिस्तानवर ५.५-०.५ असा विजय मिळवला. सलग तीन विजयांमुळे भारत आणि चीन यांनी प्रत्येकी सहा गुण कमावले आहेत. पहिल्या स्थानावरील भारताच्या खात्यावर १८ डावांअखेरीस सर्वाधिक १५.५ गुणांची जमा आहेत. पाचवेळा विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने झिम्बाब्वे आणि व्हिएतनामविरुद्धच्या लढतीत सहभाग घेतला नाही. मात्र उझबेकिस्तानविरुद्ध त्याला नॉडिरबेक याकूबोएवविरुद्ध ७६ चालींत बरोबरी स्वीकारावी लागली.