24 October 2020

News Flash

चेतेश्वर पुजारा बनणार बाबा, ट्विटरवरुन दिली आनंदाची बातमी

२०१३ साली झाले होते विवाहबद्ध

ट्विटरवरुन चेतेश्वर पुजाराने शेअर केली आनंदाची बातमी

भारतीय कसोटी संघाचा महत्वाचा खेळाडू चेतेश्वर पुजारा बाबा बनणार आहे. नवीन वर्षात चेतेश्वर पुजाराने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. आपली पत्नी पुजासोबत फोटो शेअर करत चेतेश्वर पुजाराने आपला आनंद व्यक्त केला आहे. चेतेश्वर पुजारा आणि पुजा २०१३ साली विवाहबद्ध झाले होते.

२०१७ सालात घरच्या मैदानावर खेळताना चेतेश्वर पुजाराने धावांचा पाऊस पाडत, कसोटी क्रमवारीत तिसरं स्थान पटकावलं होतं. आतापर्यंत ५४ कसोटी सामन्यांमध्ये चेतेश्वर पुजाराने ५२.९६ च्या सरासरीने ४३९६ धावा काढल्या आहेत. सध्या चेतेश्वर पुजारा दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन शहरात आहे. ५ जानेवारीपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ कसोटी, ६ वन-डे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 3:47 pm

Web Title: cheteshwar pujara wife puja pabari are soon going to be parents
टॅग Cheteshwar Pujara
Next Stories
1 फिल सिमन्स अफगाणिस्तानचे नवीन प्रशिक्षक
2 शास्त्रींमुळे भारतीय खेळाडू अपयशाने घाबरुन जात नाहीत, सहायक प्रशिक्षक संजय बांगरची स्तुतीसुमनं
3 पाकिस्तान सुपर लीगमधील सामन्यांचा दर्जा IPL पेक्षा सरस – अब्दुल रझाक
Just Now!
X