पाकिस्तान सुपर लीग टी-२० स्पर्धेत इस्लामाबाद युनायटेड संघाने कराची किंग्ज संघाचा पराभव केला. सर्व फलंदाजांच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर इस्लामाबाद संघाने शेवटच्या षटकात १९७ धावांच्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करून दाखवला. अॅलेक्स हेल्सने २१ चेंडूत ४६ धावा करत संघाला दमदार सुरूवात करून दिली. त्यानंतर फहीम अश्रफ (२५), इफ्तिकार अहमद (४९*), हुसेन तलत (४२*) आणि असिफ अली (२१*) यांनी निर्णायक खेळी करत सामना जिंकवून दिला. या सामन्यात अंपायरकडून एक अजब गोष्ट पाहायला मिळाली.

IPL 2021: मॅक्सवेल, जेमिसनच्या कामगिरीमुळे RCB झाली ट्रोल

शेवटच्या षटकात इस्लामाबाद संघाला केवळ एका धावेची गरज होती. त्यावेळी गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजाच्या बॅटला लागून मग पायाला लागला आणि फलंदाजांची विजयी धाव घेतली. गोलंदाजी संघाने अपील करत DRSची मागणी केली. पण DRSमध्येही चेंडू बॅटला लागल्याचे स्पष्ट दिसले. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी क्षणाचाही विलंब न लावता फलंदाजाला नाबाद ठरवलं. पंच अलीम दार हे त्यावेळी मैदानावर पंच म्हणून काम पाहत होते. त्यांनी फलंदाजाला नाबाद ठरवलं होतं. त्यामुळे तिसऱ्या पंचांच्या निर्णयानंतर त्यांनी आपण बरोबर असल्याचं दाखवून देत छोटंसं सेलिब्रेशन केलं.

Ind vs Eng: …अन् मैदानावर विराटचा जोरदार जल्लोष; पाहा Video

सोशल मीडियावर अनेक लोकांनी हा मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.