27 September 2020

News Flash

सचिन तेंडुलकर विरुद्धची जनहीत याचिका न्यायालयाने फेटाळली

भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या राज्यसभेतील खासदारकीच्या नेमणुकीवर आक्षेप घेणारी जनहीत याचिका दिल्ली उच्चन्यायालयाने आज(बुधवार) फेटाळून लावली आहे. घटनेच्या ८० व्या कलमांतर्गत राज्यसभेचा सदस्य होण्याचे कोणतेही

| December 19, 2012 04:34 am

भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या राज्यसभेतील खासदारकीच्या नेमणुकीवर आक्षेप घेणारी जनहीत याचिका दिल्ली उच्चन्यायालयाने आज(बुधवार) फेटाळून लावली आहे. घटनेच्या ८० व्या कलमांतर्गत राज्यसभेचा सदस्य होण्याचे कोणतेही निकष सचिनने पुर्ण न करता त्याला राज्यसभेची खासदारकी बहाल करण्यात आली त्यामुळे न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सरकारने दिल्ली उच्चन्यायालयात आपली बाजू मांडत सचिनच्या नियुक्तीचे समर्थन केले. यावर दिल्ली न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. मुरुगेसेन आणि न्यायाधीश राजीव सहाय यांच्या खंडपीठाने सदर याचिका फेटाळून लावली. ही याचिका दिल्लीतील माजी आमदार रामगोपाल सिंग सिसोदिया यांनी दाखल केली होती    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2012 4:34 am

Web Title: court refuses the pil against sachin
टॅग Pil,Sports
Next Stories
1 इंग्लंडचा ऐतिहासिक विजय
2 इस्पॅनयोलविरुद्ध रिअल माद्रिदची बरोबरी
3 कॉर्नथिअन्सचा विश्वविजेतेपदावर कब्जा
Just Now!
X