News Flash

World Cup 2019 : ‘सर जाडेजा’ चमकले ! उपांत्य फेरीच्या सामन्यात विक्रमी कामगिरीची नोंद

न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतकी खेळी

न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा अष्टपैलू रविंद्र जाडेजाने आपली निवड सार्थ ठरवली आहे. न्यूझीलंडकडून विजयासाठी २४० धावांचं आव्हान भारतीय संघाला देण्यात आलं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची दाणादाण उडाली. सर्व दिग्गज फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर उघडे पडले. मात्र रविंद्र जाडेजाने आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत भारताच्या आशा कायम ठेवल्या. रविंद्र जाडेजाने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत अर्धशतक झळकावलं.

विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत अर्धशतक झळकावणारा जाडेजा पहिला खेळाडू ठरला आहे. रविंद्र जाडेजाने फलंदाजीसोबत गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही आपली चमक दाखवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 7:02 pm

Web Title: cricket world cup 2019 ravindra jadeja creat massive record at no 8 in wc knock out game psd 91
Next Stories
1 World Cup 2019 : धोनीच्या जागेवर कार्तिकला फलंदाजीत बढती, दादा भडकला
2 सर जाडेजा न्यूझीलंडविरुद्धची ही खेळी आठवते का?; पुनरावृत्ती झाली तरच विजय शक्य
3 धोनी आहे तर विजय शक्य आहे, ही पाहा आकडेवारी
Just Now!
X