News Flash

आपल्या चाहत्यासाठी रोनाल्डोचा खास संदेश

रोनाल्डोचा हा संदेश सोशल मीडियावर व्हायरल

काही दिवसांपूर्वी मेक्सिकोत आलेल्या प्रलयंकारी भूकंपाने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. यात अनेक लहानग्यांनाही आपल्या प्राणांना मुकावं लागलं. अशाच एका लहानग्या फुटबॉलप्रेमी चाहत्याला फुटबॉलपटू ख्रिस्तीआनो रोनाल्डोने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक खास संदेश दिला आहे. सध्या रोनाल्डोच्या या फोटोला सोशल मीडियावर नेटीझन्सनी आपल्या पसंतीची पावती दर्शवली आहे.

सँटीआगो फ्लोर्स असं भुकंपात मृत्यूमुखी पावलेल्या लहानग्या मुलाचं नाव आहे. स्पॅनिश प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनूसार आपल्या याच चाहत्यासाठी रोनाल्डोने सोशल मीडियावर हा खास संदेश दिला आहे.

सँटीआगोच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी रोनाल्डोला घडलेल्या प्रकाराबद्दल कळवलं. सँटीआगो आपला प्रचंड मोठा चाहता असल्याचं कळताच रोनाल्डोने सँटीआगोच्या परिवाराच्या दु:खात आपला सहभाग नोंदवला. अटलॅडीको माद्रीद या क्लबनेही मेक्सिकोतील भुकंपबाधीत परिवारांसाठी ५० हजार युरोची रक्कम दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2017 9:35 pm

Web Title: cristiano ronaldo sends solidarity message to family of boy killed in mexicos earthquake
टॅग : Cristiano Ronaldo
Next Stories
1 रणजीपाठोपाठ दुलीप करंडक पदार्पणात मुंबईकर पृथ्वीचं शतक
2 VIDEO : पांड्याच्या बढतीची विराटने अशी साधली संधी
3 न्यूझीलंड दौरा – तिसरी वन-डे ग्रीनपार्क स्टेडीयमवर, लखनऊच्या मैदानावर लाल शेरा
Just Now!
X