05 August 2020

News Flash

‘… आता उरलीसुरली आशाही मावळली, भावनाविवश वॉर्नरची हताश प्रतिक्रिया’

बॉल टॅम्परिंग प्रकरणात व्यक्त केला खेद

बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर अस्वस्थ झालेल्या डेव्हिड वॉर्नरने पत्रकार परिषद घेत ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळण्याची उरलीसुरली आशाही मावळली आहे असे म्हणत आपल्या उपकर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत डेव्हिड वॉर्नरलाही अश्रू अनावर झाले. अत्यंत भावनिक होत त्याने यापुढे आपल्याला आता ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळायला मिळेल अशी आशाही वाटत नसल्याचेही त्याने म्हटले आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरणी स्मिथ आणि वॉर्नर या दोन्ही खेळाडूंवर १२ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. मात्र शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत डेव्हिड वॉर्नरने आपली हताश प्रतिक्रिया व्यक्त करत आता आपले ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधले करियर संपल्यात जमा आहे अशीच भावना व्यक्त केली.

बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची चांगलीच बदनामी झाली. मात्र मला हा विश्वास आहे की टीम ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा नव्या जोषात आणि नव्या उत्साहात परत येईल. मी त्या संघाचा भाग आता नसेन असेच मला वाटते आहे कारण एवढे सगळे प्रकरण झाल्यावर मला वाटत होते की कदाचित मला मी जी चूक केली आहे त्यासाठी मला माफ केले जाईल. मात्र आता माफी मिळण्याची उरलीसुरली आशाही मावळली आहे. त्यामुळे मला वाटत नाही की यापुढे मी टीम ऑस्ट्रेलियाचा भाग असेन असे म्हणत त्याने देशाची माफी मागितली आहे.

शनिवारच्या पत्रकार परिषदेत बॉल टॅम्परिंगबाबत डेव्हिड वॉर्नरने वारंवार खेद व्यक्त केला. हे सगळे प्रकरण घडल्यावर डेव्हिड वॉर्नरने पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक नागरिकाची मी माफी मागतो. तुम्ही क्रिकेटप्रेमी नसलात तरीही तुमची माफी मागतो. माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे देशाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली. त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची कितीही वेळा माफी मागायला तयार आहे. मी टीम ऑस्ट्रेलियाचा उप कर्णधार म्हणून मुळीच चांगली कामगिरी करू शकलो नाही असेही वॉर्नरने म्हटले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2018 10:09 am

Web Title: david warner tearfully apologises over ball tampering scandal in press conference
Next Stories
1 शेवटच्या श्वासापर्यंत मला बॉल टॅम्परिंगची खंत राहिल- डेव्हिड वॉर्नर
2 ‘स्मिथ,वॉर्नर चुकले.. पण त्यांचे करिअर कुरतडले जाऊ नये हीच इच्छा!’
3 मार्करामचे मालिकेतील दुसरे शतक
Just Now!
X